नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून विरोधी पक्षातील आमदारांनी विधानसभा पायऱ्यांवरच आंदोलन सुरू केलं आहे. काल दिशा सालियन प्रकरण आणि सभागृहातील अध्यक्षांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जंयत पाटलांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट
सत्ताधारी आमदारांनी काल AU म्हणून घोषणा दिल्या आहे. त्यासंदर्भात अनन्या उदास म्हणून रिया चक्रवर्तींनी माझी मैत्रिण असल्याचं तिने काल सांगितलं आहे. कुठला संबंध नसतांना तसेच कारण नसताना समाजात गैरसमज पसरवण्याचा काम सत्ताधारी पक्षातील आमदार करीत आहे. हा सर्व बालिशपणा असून त्यांची मला किव कराविशी वाटते. तसेच त्यांच्यात केंद्रीय मंत्री देखील यात सहभागी होतात. ही लोकशाहीची थट्टा आहे. असं अजित पवार यांनी कालच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली
आदित्य ठाकरे यांच्यावर जाणूनबुजून एआयटी बसावायची, मग दर आठ दिवसांनी त्यांनी कार्यालयात जाणार. मग ते टिव्हीवर दिसणार आणि या 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार. महाराष्ट्रला याची कल्पना असून यामध्ये काही सत्य नाही. जर सत्य असतं तर याला सोडलं नसतं. परंतु या सर्व प्रकार लपवण्यासाठी हा डाव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील एकही आमदार तुम्हाला घाबरत नाहीत. ज्यांना अटक करायची ती करा. असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…
दरम्यान, महाराष्ट्र बाहेरील प्रकल्प, सीमावाद, यावर आम्ही बोलत आहेत. परंतु काल संपुर्ण दिवसभर वेगळ्याच मुद्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी गाजवलं. म्हणजे महत्वाचे प्रश्न बाजूला सारायचं, अन् वेगळेच विषय काढायचे असा नियोजन सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांचा भुखंड प्रकरणाचा मुद्दा बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी हे सर्व केले आहे. आम्ही सत्य मेवची बाजू मांडत आहोत. तर त्यांची बाजू ही सत्ता मेव जयतेची आहे. त्यामुळे ते कधीच जिंकणार नाहीत. तसेच आमचा आवाज जरी दाबला गेला तरी महाराष्ट्राला विकू देणार नाहीत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा
- “…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत
- “जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे
- “मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले
- जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन