नवी दिल्ली : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेेते राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिशासालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलं असून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यावरून काल राज्यभरात मोठा गोंधळ बघायला मिळाला. यातच त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली असून ते 2024 ला संसदेत दिसणारही नाहीत. असा सुचक इशाराही त्यांनी दिला आहे.
पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली
राहुल शेवाळे हे आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करायला देशाचे अॅटर्नी जनरल नाहीत. उद्या ते 2024 ला संसदेत दिसणारही नाहीत. मला त्यांच्याबद्दल सांगू नका, आम्हालाही कायदा कळतो. आम्ही 20 वर्ष संसदेत आहोत. आम्ही कायदा बनवणारे आहोत. आम्हीही राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे कायदा आम्हालाही कळतो, असं म्हणत संजय राऊतांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत राहुल शेवाळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…
भाजप नेते मोहित कंबोज यांना क्लिनचिट मिळाली आहे. त्यावर ते म्हणाले की, भाजपने आता क्लिनचीटचा कारखानाच उघडला आहे. कुणकुणाला मिळाला आहे. ते माहिती नाही. बोम्मई तसेच, उद्या दाऊदने भारतात राहिला तर त्यांनाही क्लिनचीट मिळेल. अब्बु सलीम सध्या तुरूंगात आहेत. त्यांनीही जर भाजपला एक पत्र लिहिलं तर त्यांनाही कदाचित क्लिनचीट मिळेल, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपला हाणला. तसेच या भारतात कुणालाही क्लिनचीट मिळू शकते, अन् गुन्हेगार विरोधकांना ठरवलं जावू शकतं. असंही संजय राऊत म्हणाले.
राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”
दरम्यान, काल दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अजून चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधानसभेत केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. याच विषयावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
Read also
- “…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत
- “जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे
- “मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले
- जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन
- “या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट