नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनचा चौथा दिवस वादळी ठरला. सुरूवातीलाच विरोधी पक्षांनी पायऱ्यावर सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर सभागृहात नाना पटोले यांनी रश्मी शुल्का विषय काढला, त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यातच दिशा सालियन प्रकरणावरून विरोधकांनी आदित्य ठाकरेंना घेरलं. मग यामधून मग जंयत पाटलांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे सहभाग जवळपास सहा ते सात वेळा तहकुब करावा लागला.
“दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब
यावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खोके सरकारने सकाळपासूनच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्याबद्दल आम्हाला ठरवून बोलू न देता सतत स्वत: कामकाज बंद पाडले. राज्यपालांचा महाराष्ट्र द्वेष. बोम्मईंची दादागिरी, मुख्यमंत्र्यांचा घोटाळा ह्यावर बोलूच दिले नाही. महाराष्ट्राचे अनेक विषय अनुत्तरीत ठेऊन लोकशाहीचा खुन केला. असा रोष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
“आफताबाची जशी नार्को टेस्ट झाली तशी आदित्य ठाकरेंची करा”; नितेश राणेंची सभागृहात मागणी
आज दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियन प्रकरणात SIT चौकशीची मागणी करताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मान्यता दिली. यावरून शिवसेनेचे नेते भास्कराव जाधवांना बोलू न दिल्याने जंयत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं.
दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ
यातच विधान परिषदेतही दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचीही एका प्रकरणी SIT चौकशी करावी अशी मागणी केली. त्यावर सभापती निलम गोऱ्हे यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर दोन्हीही सभागृहात फक्त गोंधळ बघायला मिळाला.
Read also
- जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन
- “या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट
- पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली
- जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…
- राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”