नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. आतापर्यंत ६ वेळा सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांना बोलू द्यावे,अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना बोलू न दिलं. त्यावर तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका, असं म्हणत जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जयंत पाटलांना निलंबित करण्याची मागणी केली.
दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ
जयंत पाटलांचं निलंबण केल्यानंतर विधान सभेच्या परिसरात आघाडीतील नेत्यांनी आंदोलन केलं. तसेच आघाडीच्या सर्व आमदारांनी जयंत पाटलांनी खांद्यावर उचलून घेत आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं त्यांनी संदेश दिला. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल केला.
“गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकार्न”, विरोधकांची नवी घोषणा, परिसर दणाणला
तसेच निलंबणाची कारवाई केल्यानंतर जयंत पाटलांनी एक सुचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार,,,,, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय असा टॅग केला आहे. जंयत पाटलांच्या कारवाईवर नाना पटोले यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
“मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल
दिशा सालियन प्रकरण सध्या राज्याच्या विधानसभेत चांगलचं गाजत आहे. यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. यावरून जंयत पाटलांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावरून शंभुराज देसाई यांनी जयंत पाटलांच्या निलंबणाची मागणी केली. त्यावर कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी निलंबणावर प्रस्ताव मांडून तो प्रस्ताव सत्ताधारी पक्षातील बहुमतावर मान्य करण्यात आला.
Read also
- पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली
- जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…
- राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”
- “दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब
- “आफताबाची जशी नार्को टेस्ट झाली तशी आदित्य ठाकरेंची करा”; नितेश राणेंची सभागृहात मागणी