अमरावती : राज्यात महाविकास आघाडी सरकारसमोर एमआयएमने युतीचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजपच्याही काही नेत्यांनी यावरून शिवसेनेला चांगलं धारेवर धरत निशाणा साधला. आता अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना एका भाजपच्या नेत्यांची जीभ घसरली आहे.
भाजपचे वरचे नेते अनुकुल मात्र..; पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने सतेज पाटलांची प्रतिक्रिया
एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलचं टिकास्त्र सुरू झालं. भाजबने शिवसेनेला जनाब म्हणून हिनवलं तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिजबुल जनता पक्ष करत टीका केली. यावर भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उडी घेतली.
मग तुमच्या सरकारच्यावेळी महाराजांचा विधानसभेत फोटो का नाही लावला? अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर
अनिल बोंडे यांनी टीका करताना असं म्हणाले की, बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्यालाXXX म्हणतात. आणि ती लाचारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणली अशा शेलक्या शब्दात त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. हिंदू शिवसेनेची साथ सोडत आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शिवसेना आता शरद पवारांची बी टीम म्हणून काम करतेय. आम्ही शरद पवारांचे चमचे आहोत, असं स्वत: ते म्हणतात. गोवा उत्तर प्रदेशात हिंदू समाजानं शिवसेनेला नोटा खाली झोपवलं असा घणाघात अनिल बोंडे यांनी शिवसेनेवर चढवला.
ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार; तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ कडाडल्या
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात जनाब या शब्दाचा वापर करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख हिजबुल पार्टी म्हणून केला. त्यावरून सध्या राज्यात जोरदार घमासान सुरू आहे.
Read also:
- नवाब मलिकांना अजून एक न्यायालयाचा दणका; दिलासा नाहीच
- “शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी”
- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
- 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
- मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका