नवी दिल्ली : भारत देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे भारतरत्न या सर्वाच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. १९५४ साली हे पुरस्कार देण्यास सुरूवात झाली असून दरवर्षी २५ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंंध्येला पुरस्कारसाठी निवड झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर केली जातात.
हेही वाचा…मुहूर्त शोधला..! महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ३० महिलांसाचा समावेश असून १३२ पैकी महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले
कला, साहित्य शिक्षण, क्रीड, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, सनदी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहेत.
पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले आणि एकूण महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी
*पद्मविभूषण* (एकूण : 5)
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला) चिरंजिवी (कला)
श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
*पद्मभूषण*
(एकूण : 17)
महाराष्ट्रातून
1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
2) अश्विनी मेहता (औषधी)
3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
4) राजदत्त (कला)
5) प्यारेलाल शर्मा (कला)
6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
*पद्मश्री* (एकूण : 110)
महाराष्ट्रातून
1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
2) मनोहर डोळे (औषधी)
3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
READ ALSO :
हेही वाचा..“मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवा,” रोहित पवारांची महापालिकेकडे मागणी
हेही वाचा…सकाळी झोपतच घेतली माझी सही, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांची मोठी फसवणूक ?
हेही वाचा…“तिघांपैकी एकाने यावं, अन् तोडगा काढावं, लगेच माघारी फिरतो,” जरांगे पाटलांची भूमिका
हेही वाचा…मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर..! “२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला”
हेही वाचा“….हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका, मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना