नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. याचमुळे उद्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्याचा मान सरकारकडून डावलला असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा“….मराठा आरक्षणावर लोणावळ्यातच तोडगा निघणार ? थोड्याच वेळात मुख्यमंत्री जरांगेंशी चर्चा करणार
मनोज जरांगे पाटलांसह उद्या २६ जानेवारी रोजी मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहे. तर प्रजासत्ताक दिनीनिमित्ताने उद्या मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये देखील १४४ कलम लागू करण्यात आले आहेत. याच छगन भुजबळ यांना प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा मान डावलला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी यावरून राज्य सरकार तसेच महायुतीवर जोरदार टिका देखील केली आहे.
हेही वाचा…लोकसभा जागावाटपासाठी आघाडीची बैठक, वंचितला निमंत्रण, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ?
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना कशी वागणूक देण्यात येते हे तर स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज्यातील जनतेला माहित आहे. भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या शिंदे -फडणवीस – अजित पवार यांच्या महायुती सरकारने भाजपच्या ओबीसी विरोधी विचारांचे अनुकरण करत त्यांच्या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचा किती मान आणि महत्त्व आहे हे यावरून दाखवून दिले. या सरकार मध्ये ओबीसी नेत्यांचा वाटेला अशीच वागणूक येणार हे तर आधीपासूनच स्पष्ट होते. छगन भुजबळांचे सरकार मधील बळ किती आहे हे आज राज्यातील जनतेला सुद्धा महायुती सरकारने दाखवून दिले. असेही वडेट्टीवारांनी सांगितले आहे.
महायुती सरकारने ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा मान डावलल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना कशी वागणूक देण्यात येते हे तर स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज्यातील जनतेला माहित आहे.
भाजपच्या नेतृत्वात…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 25, 2024
READ ALSO :
हेही वाचा“….हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका, मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना
हेही वाचामुहूर्त शोधला..! महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले
हेही वाचा…आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…“सत्ता आल्यास १ महिन्यात आरक्षण देणार, फडणवीसांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?”