पनवेल : लोणावळा येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा संपताच गुरूवारी दुपारी मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविणारे राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईकडे शहरीवस्तींमध्ये ठिकठिकाणी थांबून आपला जल्लोष मराठा आंदोलक साजरा करतांना दिसत आहेत. यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून मराठा समर्थकांची फेरी येणार नसली तरी पनवेल ते शीव महामार्गावर गुरूवारी दुपारी मराठा समर्थकांनी भरलेली वाहने येऊ लागली आहेत.
हेही वाचा…लोकसभा जागावाटपासाठी आघाडीची बैठक, वंचितला निमंत्रण, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ?
यातच मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांनी हलगी, ढोलताशांच्या वाद्यांवर ठेका धरत प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मराठा समर्थकांकडून एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देखील देण्यात येत आहेत. तर हजारों गाड्यांच्या टपावर बसून मराठा आंदोलक पुर्णपणे जोशात मुंबईच्या दिशेने हळूहळू कूच करतांना दिसत आहेत.
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करणार आहेत. परंतु त्याआधीच राज्य सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहचले. तसेच आझाद मैदानावर वरील आंदोलनाची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. तरीही जरांगे पाटलांचा ताफा आता मुंबईच्या वेशीकडे सरकू लागला आहे.
READ ALSO :
हेही वाचामुहूर्त शोधला..! महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले
हेही वाचा…आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…“सत्ता आल्यास १ महिन्यात आरक्षण देणार, फडणवीसांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?”
हेही वाचा“….मराठा आरक्षणावर लोणावळ्यातच तोडगा निघणार ? थोड्याच वेळात मुख्यमंत्री जरांगेंशी चर्चा करणार