मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आज महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंट, नरिमन पॉईट मुंबई याठिकाणी बैठक पार पडत आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असून जागा वाटप केल्या जाणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. परंतु यातच आता महाविकास आघाडीकडून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना सुनावत त्यांना पत्राद्वारेच उत्तर पाठवले आहे.
हेही वाचा…मीरा रोडवर दोन गटात दगडफेक, विरोधीपक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले, की,..
नाना पटोले यांनी आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलंय की, देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवीत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरूध्द लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत ‘वंचित’ आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया ‘वंचित’तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती.
हेही वाचा…अजितदादांचा आज पुन्हा शिरूर दौरा, अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या, म्हणाले…
नाना पटोले यांनी पाठवलेल्या पत्रावर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा पत्र पाठवलं आहे.
महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांच्या बाजूलाच तुम्ही बसले होते. त्यावेळी निवडणूक जाहीर झाल्यावर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला जाईल. असे स्पष्टपणे म्हटले होते. मग दुसरीकडे तुमच्या स्व: च्या स्वाक्षरीचे निमंत्रण देत आहात. तसेच अनेकदा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांड असल्याचे सांगितले जातात. तुमची ही दुहेरी भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, किंवा राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या सहीचे पत्र पाठवा तर आम्ही बैठकीला येऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
My reply — pic.twitter.com/c0gBi6I96C
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 25, 2024
READ ALSO :
हेही वाचा…आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…“सत्ता आल्यास १ महिन्यात आरक्षण देणार, फडणवीसांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?”
हेही वाचा“….मराठा आरक्षणावर लोणावळ्यातच तोडगा निघणार ? थोड्याच वेळात मुख्यमंत्री जरांगेंशी चर्चा करणार
हेही वाचा…लोकसभा जागावाटपासाठी आघाडीची बैठक, वंचितला निमंत्रण, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ?
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात एकच चर्चा