पुणे : मागील काही दिवसापासून पुण्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणावरून अनेक चौकशा सुरू आहेत. तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजा मारणेनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गजा मारणेनी पार्थ पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे शहाराध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेवकर दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख देखील उपस्तित होते.
हेही वाचा…ईडीच्या चौकशीनंतर तब्बल ११ तासानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. मारणे टोळीची कोथरूड, तसेच शहरात दहशत असून मारणे याच्या पत्नी जयश्री या मनसेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. मारणेनेे पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल”
दरम्यान, गजा उर्फ महाज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला असून शास्त्रीनगरमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला होता. कोथरूड आणि पुणे शहरात मारणे टोळीची दहशत आहे. घायवळ गॅग आणि मारणे गॅंग यांच्यातील वर्चस्वाचा वाद सगळ्यांना माहिती आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मीरा रोडवर दोन गटात दगडफेक, विरोधीपक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले, की,..
हेही वाचा…अजितदादांचा आज पुन्हा शिरूर दौरा, अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या, म्हणाले…
हेही वाचा“….तर ओबीसी आरक्षण टिकवणं कठीण जाईल”, प्रकाश आंबेडकरांनी दिला सुचक इशारा
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग बदलला, ‘या’ मार्गावरून मराठे मुंबईत धडक मारणार
हेही वाचा…रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल ११ तास बसून राहिले, अन् दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या