लोणावळा : मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी यावरून राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी यावं आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढावा. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढला तर आम्ही माघारी जाऊ, असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“सत्ता आल्यास १ महिन्यात आरक्षण देणार, फडणवीसांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?”
लोणावळ्यातून मनोज जरांगे पाटलांचा ताफा पनवलेच्या दिशेने सुरू झाला आहे. त्याआधी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लोणावळ्यात जरांगे पाटलांची भेट घेतली. यानंतर आम्ही आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो आहोत. कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे, पण आम्हाला आरक्षण हवं आहे. कुठेही मार्ग निघतो म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला आरक्षण मिळणार आहे, मिळाल्यावर गावाकडे जाऊ. आम्हाला मुंबईत जाण्याची हौस नाही. पण मराठा समाजाला आरक्षण हवं. दीड दिवसापुर्वी तेच सांगितलं. आठ दिवसापुर्वी तेच सांगितलं. पण तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा काहीही चर्चा करा, पण आम्हाला आरक्षण हवंच आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. आम्ही तोपर्यंत मुंबईकडे जातो. असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा“….मराठा आरक्षणावर लोणावळ्यातच तोडगा निघणार ? थोड्याच वेळात मुख्यमंत्री जरांगेंशी चर्चा करणार
दरम्यान, मला विनंती करायची आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही मजा करायला मुंबईला आलो नाही. मुंबईकरांचे आणि आमचेही हाल होऊ नयेत. त्यामुळे तोडगा काढा. माझ्या समाजाच्या वतीने माझी विनंती आहे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघांनी चर्चा करावी, लगेच तोडगा काढावा. जुनं नवं शिष्टमंडळ येतं पण तोडगा निघत नाही. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढून जावं असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर..! “२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला”
हेही वाचा“….हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका, मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना
हेही वाचामुहूर्त शोधला..! महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले
हेही वाचा…आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय