मुंबई : राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून अनेक प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर जाताना दिसत आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा इअरबस आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन देखील महाराष्ट्राच्या हातून गेला आहे. त्यामुळे आता विरोधकांना एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. मात्र शिंदे याचा दोष महाविकास आघाडीला दिला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
“राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”
महाराष्ट्र सरकारचे आणखी एक अपयश असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदेवर टिका केली आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, एअरबस टाटा हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेल्यानंतर ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प देखील महाराष्ट्रबाहेर गेले असल्याची टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
किर्तीकरांनी पक्ष सोडला, राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्यापासून लोक त्यांनाही…”;
ऊर्जा उपकरण निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून जवळपास 400 कोटी रूपयाचे अनुदान मिळणार होते. केंद्र सरकारकडून ऊर्जा निर्मिती झोन मिळवण्यासाठी आठ राज्यांच्या प्रस्ताव मागविला होता. आलेल्या या आठ राज्यांच्या प्रस्ताव्यांचे एका एजन्सीमार्फत मुल्यमापन केले. अन् त्यातून केंद्र सरकारने मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाची निवड करण्यात आली .
Read also
- राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय..! बच्चू कडूंची 25 वर्षाच्या मागणीला यश
- जितेंद्र आव्हाडांना काही तासातच जामीन मंजूर..! राष्ट्रवादीचा मोठा जल्लोष
- राजकारण पुन्हा तापलं…! जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!
- अन् राहुल गांधींसमोरच मांडला कुस्तीचा फड..! कोल्हापुरचे रांगडे गडी एकमेकांत लढले
- “महाराष्ट्राच्या हातून अजून एक प्रकल्प गेला, विरोधकांचा सरकारवर निशाणा