मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या संजय राठोड आणि अब्दूल सत्तर या नेत्यांना मंत्रिपद दिल्याने विरोधी पक्षाचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर वारंवार टीका करताना दिसत आहेत. संजय राठोड यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीने संजय रोठोडांची, त्यांच्या बायकोची, मुलांची माफी मागावी अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपने सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे या राज्यातील खूप मोठ्ठ्या नेत्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या होत्या. आजही त्या तिथल्या नेत्या आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, की जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे.
“एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
महाविकास आघाडीने मग त्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी तिची ज्या पद्धतने धिंड काढली, तिच्या गाडीत कशा पद्धतीने पिस्तुल ठेवण्यात आले? तिला कशा पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आले? हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नयेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी मारला आहे.
“शिवसेनेने देखील असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही सेना फोडली” भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
भारतीय जनता पार्टीनं संजय राठोडांची, त्यांच्या बायकोची, मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संजय राठोड आणि अब्दूल सत्तार यांच्यासारख्या गंभिर आरोप असणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली.
Read also
- नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
- “केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका
- वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची
- “तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा