दिल्ली : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करत सरकार स्थापन केले तर बिहारमध्ये या उलट नितीशकुमार यांनी भाजपला सत्तेतुन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपने जद्यू फोडण्यासाठी ऑपरेशन लोट्स चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा नितिशकुमार यांनी दावा केला आहे.
“ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
आम्ही 74 जागा जिंकण्यात यशस्वी झालो, पण पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आणि एनडीए आघाडीत नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. पण आज जे काही घडले तो बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघातक आहे. शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले, असं भाजप नेते सुशिलकुमार मोदी म्हणाले.
“शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”
नितीश कुमार यांना राज्यामध्ये तो आदर मिळणार नाही जो त्यांनी भाजपसोबत असताना मिळवला. आम्ही त्यांना अतिरिक्त जागा न घेता मुख्यमंत्रई बनवले. अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी NDA आघाडी अंतर्गत निवडणुक लढवली होती आणि JDU आणि BJP ला पाठिंबा दिला होता. जेडीयूने बिहारचा विश्वासघात केला आहे. मतदारांनी दिलेल्या मतांशी खेळले आहेत, असा आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 7 पक्षांच्या 164 आमदारांचे समर्थन पत्र सादर केले. नितीश कुमार आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 21 महिन्यात ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 17 वर्षांत ते आठव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. नितीश यांच्यासोबत आरजेडी नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे धाकटे सुपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदीची शपथ घेणार आहेत.
Read also
- “आमच्यासोबत खरी शिवसेना, त्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
- “उशिरा आलेल्यांना पहिल्या पंगतीत अन् पहिले जे आले त्यांना शेवटी”; मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची नाराजी
- “फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाची ओझी शिंदे गटाने ठेवलीय”
- मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
- फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू