दिल्ली : महाराष्ट्रात देखील शिवसेनेने असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले, असं वक्तव्य भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
शिवसेनेला कोणीही संपवु शकत नाही. शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने घडवले आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना उभी केली. शिवसेनेच्या विषयी काहीही बोलताना विरोधकांनी शिवसेनेचे महाराष्ट्रातील योगदान लक्षात घेऊन टीका करावी नाहीतर महाराष्ट्रातील जनता त्यांची खिल्ली उडवेल, असं शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू
भाजप विरोधी पक्षालाच संपवत नाही तर सोबत असणाऱ्या पक्षांनाही संपवन्याचा प्रयत्न करत आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते आहे.सर्व पक्षांना संपवून देशात फक्त भाजपच राहिल अशी भुमिका भाजपची आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असणारी खरी शिवसेना आहे. भाजपसोबत जुनियर बीजेपी आहे. शिवसेना आम्हीच आहे म्हणानाऱ्यांना सुप्रिम कोर्ट त्यांना त्यांची योग्य जागा दाखवेल, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
“ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
संजय राठोड यांच्यावर भाजपने आरोप लागावले होते. महाविकास आघाडीने आरोप होत असल्यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदावरून हटवले मात्र भाजपने अनैतिकता दाखवत संजय राठोड यांना पहिल्या विस्तारात मंत्रिमंडळात स्थान दिले. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला संधी दिली नसल्यामुळे संजय राठोड यांना महिला व बाल विकास मंत्रीपद देण्यात यावे, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
Read also
- “एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
- “शिवसेनेने देखील असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही सेना फोडली” भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
- “आमच्यासोबत खरी शिवसेना, त्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
- “उशिरा आलेल्यांना पहिल्या पंगतीत अन् पहिले जे आले त्यांना शेवटी”; मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची नाराजी
- “फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाची ओझी शिंदे गटाने ठेवलीय”