सातारा : कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने कोरेगाव मतदार संघात त्यांची ग्रंथतुलना करण्याचा क्रायक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी एका उत्साही कार्यकर्त्यांने घोषणा देताना आमदार महेश शिंदे यांच्या नावा ऐवजी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला गेला, यामुळे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हाशा उडालेला पाहायला मिळाला. या संपुर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमात महेश शिंदे ग्रंथतुलना करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात एका अतिउत्साही कार्यकर्त्यांने नेहमीप्रमाणे विजयाची घोषणा दिली. मात्र आमदार महेश शिंदे यांच्या नावा ऐवजी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला. उपस्तित कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच नावाची दुरूस्ती करुन पुन्हा घोषणा बाजी करण्यात आली.
“फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाची ओझी शिंदे गटाने ठेवलीय”
आमदार महेश शिंदे यांनी मात्र या चुकीकडे हसून दूर्लक्ष केले. ही चूक संबंधित कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यानेही बदल केला. सध्या महेश शिंदे यांचे कोरेगाव मतदार संघात चांगलेच वर्चस्व असल्याचं दिसत आहे. महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करत कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडातही महेश शिंदे हे सहभागी झाले होते.
मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील महत्वाचे नेते म्हणुन शशिकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. शशिकांत शिंदे यांनी जावळीतून येऊन कोरेगाव मतदारसंघात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा परिणाम आजही महेश शिंदे यांच्या कार्यक्रमात दिसुन आला जनतेच्या मनात आजही आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव कायम असल्याचं दिसत आहे.
Read also
- “तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा
- “शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- “एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
- “शिवसेनेने देखील असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही सेना फोडली” भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
- “आमच्यासोबत खरी शिवसेना, त्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला”