जालना : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर त्यांनी लगेच महाराष्ट्रा दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी आपल्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन जाहीर प्रचार सभा घेत कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावून एकनाथ शिंदे हे रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेत होते. याच दरम्यान त्यांची तब्येत देखील बिघडली होती. अशातच आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जालन्यात येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
“अजित पवार माध्यमांशी बोलताना गोंधळले; म्हणाले, मी राज्याचा उप..”
जालन्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळवण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मदत करावी, आदी विषयांवर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जालन्यात येँण्याचं निमंत्रण दिलेले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी खोतकर यांचे आमंत्रण स्विकारले तर त्यांचा मराठवाड्यात दुसरा दौरा असणार आहे.
कावळे संपतील, गायी राहतील..! जे. पी नड्डाजी, जरा जपून..!
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर प्रथमच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे छायाचित्र खोतकरांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळवण्यासाठी निधी मंजुर करावा व विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी भेट घेतली आहे.
“आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकाची उद्धव ठाकरे
जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील साखर कारखान्याच्या व्यवहारात अनियमितता आढळली होती. त्यामुळे खोतकरांचं कुटुंब अडचणीत सापडलं होतं. या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचं सांगण्यात येत आहे. खुद्द अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला समर्थन दिलं. मात्र जालन्यातील प्रलंबित विकास कामं तसेच राम नगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं असल्याचं खोतकर यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्जुन खोतकर यांच्या कामांना मदत करणार का याकडे जालन्याच्या लोकांचे लक्ष लागलेले आहे.
जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्यशासनाने मदत करावी व विविध विषयांवर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत चर्चा करून जालना भेटीसाठी निमंत्रण दिले.@mieknathshinde pic.twitter.com/GxyVy2NJfO
— Arjun Khotkar (@miarjunkhotkar) August 5, 2022
Read also
- आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
- “राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादीची टोपी सगळीकडे दिसायला हवी”
- “आगामी महापालिका, ZP व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल”
- पाटलांच लेक राजकारणात होतंय सेट
- इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी