मुंबई : राज्यातील हिवाळी अधिवेशन सध्या वादळी ठरत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच महाविकास आघाडीतील काही व्हिडीओचा भाग ट्विट करत मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. याव्हिडीओ मध्ये जयंत पाटील, भास्कर जाधव, अजित पवार दिसत आहेत.
नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्
विधान भवनाच्या परिसरात महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेतला हा व्हिडीओ गजानन काळे यांनी शेअर केला आहे. त्यात जंयत पाटील भास्कर जाधव यांनी आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना असे म्हणत आहेत. त्यावर भास्करराव जाधव देखील मान हालवून त्याला प्रतिसाद देतांना दिसत आहेत. त्यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी हल्लाबोल केला आहे.
गजानन काळे यांनी ट्विट करत त्यावर म्हटलं आहे की, पोटातलं ओठावर आलंच. राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना, आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना जंयत पाटील, भास्कर जाधव यांनी पण मान्य केले आहेच. असं म्हणत गजानन काळे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेले डिवचलं आहे.
“बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे अडचणी येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राहुल शेवाळे यांची देखील बलात्कार प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी सभापतींनी मान्य केली आहे. त्यामुळे सोेमवारी विधानसभेत आणखीच राडा होण्याची शक्यता आहे.
पोटातलं ओठावर आलंच … राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना …
“आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना ” – जयंत पाटिल …
भास्कर जाधव यांनी पण मान्य केले आहेच … pic.twitter.com/oH0hpLEHGL— Gajanan Kale (@GajananKaleMNS) December 23, 2022
Read also
- “या प्रकरणी अमृताताईंनी निष्क्रिय गृहमंत्री फडणवीसांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी”
- “दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही निघत नाही”
- “गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय, पण..;” आव्हाडांची नाराजी
- राजकारण तापणार…! फडणवीसांवर सोमवारी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
- “वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर..;”राष्ट्रवादीचा हल्लाबोल