नागपूर : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या पाचव्यादिवशीही वादळी ठरलं आहे. सुरूवातीलापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात राडा झाल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांना हिवाळी अधिवेशनापुरतं निलंबित केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जहरी टिका केली आहे.
बचके रहना रे बाबा..! फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा डाव, भुखंड प्रकरण शिंदेंवरच उलटणार
जयंत पाटलांनी काहीही चुकीचं बोललं नाही. निर्लज्ज ही काही शिवी नाही. लाज नसलेल्या माणसाला निर्लज्ज म्हणतात, त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय. पण मला अध्यक्षांनी एकदाही बोलू दिलं नाही. आम्ही मुद्यांवर बोलतोय. एनआयटीचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. हा भ्रष्टाचार तुम्ही दडपणार असाल तर कसं चालेल? असा सवाल करीत हा तुम्ही केलला भ्रष्टाचार आहे अशी टिकाही त्यांनी टीव्ही 9 शी बोलतांना मुख्यमंत्र्यांवर केली.
देवेंद्र फडणवीस पुण्यातून अचानक दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आदित्य ठाकरेंना अडचणीत पकडलं आहे. या प्रकरणाची आता एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावरून सभागृहात कालपासून मोठा गदारोळ बघायला मिळाला.
“राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी
दरम्यान, या गदारोळात भास्कर जाधव यांना सभागृहात अध्यक्षांनी बोलू न दिलं. त्यावेळी अध्यक्ष महोदय, तुम्ही असा निर्लज्जपणा करू शकत नाही. असं जयंत पाटलांनी म्हटलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेत निलंबित करण्याची मागणी केली. यावर चंद्रकांत पाटलांनी प्रस्ताव मांडला अन् तो मंजूर करण्यात आला.
Read also
- राजकारण तापणार…! फडणवीसांवर सोमवारी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
- “वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर..;”राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्
- “सध्या मुख्यमंत्र्यांना ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ”; कोंडगेंचा फोटो ट्विट करून राष्ट्रवादीने डिवचलं
- “बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन