पुणे : हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी मोठा भुकंप होणार का ? असा सवाल अनेकांनी यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. अधिवेशनात विरोधकांनी सीमावादाचा प्रश्न उचलून धरलं आहे. त्याच्याच संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.
“राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा
आज पुण्याच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या अत्यंविधीला फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रंद्धाजंली वाहिल्यानंतर ते अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीला फडणवीस नेमकी कुणाची भेट घेणार ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभेत सीमावादाचा ठराव मंजूर करून घेतला आहे. त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आपल्याही सभागृहात हा ठराव मंजूर करून घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यावरून विरोधकांनी अनेक वेळा सभागृह तहकुब देखील केलं.
“जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे
दरम्यान, सीमावादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अमित शहांशी भेट फडणवीसांनी घेतली होती. परंतु तरीही सीमावाद अजूनही तसाच पेटला आहे.
Read also
- “राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी
- “राहुल शेवाळेंचं मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप, गुंडाच्या माध्यमातून दिली धमकी”
- “कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”
- “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे”; नवनीत राणांची मागणी
- “अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”