नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस वादळी ठरला आहे. काल दिशा सालियन प्रकरण, सीमावाद आणि इतर मुद्यांवरून सभागृहात मोठा गदारोळ बघायला मिळाला. यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावरून त्यांच्या विधानसभेत ठराव मंजूर घेतला आहे. यावरून विरोधी पक्षातील आमदारांनी आज विधानसभेच्या पायऱ्यांवरच आंदोलन करत मुख्यमंत्र्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली आहे.
“मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले
काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाचा ठराव मंजूर करून घेतला आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राज्यातील विरोधी पक्षातील आमदारांकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच आज विधानसभेच्या पायऱ्यांवर कर्नाटक सरकार मुजोरी करतंय. महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय. कर्नाटक सरकारचा निषेध असो. बेळगावं, कारवार, निपाणी, बीदर, मालकी, संतपुरसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अशा घोषणा देण्यात आल्या.
जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांचं निलंबण केल्यानंतर विरोधी पक्षांनी सभागृहात न जाण्याचा आज निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीच्या आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मिनी विधानसभा तयार करून शिंदे सरकारच्या या कृतीचं जाहीर निषेध केला.
“या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट
दरम्यान, आज सकाळी काही काळ दोन्ही सभागृहाचं कामकाज चालू झालं, पंरतु भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने त्यांची अत्यंयात्रा सुरू होणार असल्याने कामकाज थांबवलं आहे. त्यामुळे आज कोणत्याही सभागृहात विधिमंडळाचं कामकाज होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे”; नवनीत राणांची मागणी
- “अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”
- “राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा
- “…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत
- “जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे