मुंबई : जयंत पाटील आणि माझ्यावर तुम्ही खटले दाखल केले आहेत. आता महाराष्ट्राचा अपमान केल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर तुम्ही खटला दाखल करणार का ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला केला आहे. काल कर्नाटकच्या विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर संजय राऊतांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
“आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे”; नवनीत राणांची मागणी
सध्या इथल्या सरकारला अनेक शेपट्या फुटल्या आहेत. तुम्ही इतर विषयामध्ये शेपट्या घालाल. परंतु वीस लाख बांधवांनासाठी 70 ते 75 वर्ष लढा देत आहोत. किमान त्यांच्यासाठी तरी महाराष्ट्राशी इमान राखा, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना सुनावलं. चीनने जगभरात घुसखोरी केली आहे. त्यात भारताचा देखील समावेश आहे. तशाच प्रकारची घुसखोरी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही देखील बेसावधपणे मार्ग अवंलबत असेल तर आम्हाला देखील हा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही त्यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
“अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”
भाजप नेते मोहित कंबोज यांना क्लिनचिट मिळाली आहे. त्यावर ते म्हणाले की, भाजपने आता क्लिनचीटचा कारखानाच उघडला आहे. कुणकुणाला मिळाला आहे. ते माहिती नाही. बोम्मई तसेच, उद्या दाऊदने भारतात राहिला तर त्यांनाही क्लिनचीट मिळेल. अब्बु सलीम सध्या तुरूंगात आहेत. त्यांनीही जर भाजपला एक पत्र लिहिलं तर त्यांनाही कदाचित क्लिनचीट मिळेल, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपला हाणला. तसेच या भारतात कुणालाही क्लिनचीट मिळू शकते, अन् गुन्हेगार विरोधकांना ठरवलं जावू शकतं. असंही संजय राऊत म्हणाले.
“राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा
दरम्यान, काल दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अजून चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधानसभेत केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. याच विषयावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
Read also
- बचके रहना रे बाबा..! फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा डाव, भुखंड प्रकरण शिंदेंवरच उलटणार
- देवेंद्र फडणवीस पुण्यातून अचानक दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
- “राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी
- “राहुल शेवाळेंचं मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप, गुंडाच्या माध्यमातून दिली धमकी”
- “कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”