नागपूर : राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे वादळी सुरू आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्यो जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
“राहुल शेवाळेंचं मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप, गुंडाच्या माध्यमातून दिली धमकी”
नागपूर येथील मनसेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर दोन दिवसापासून आले आहेत. सकाळी राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांनी नागपूरच्या विमानतळावर जोरदार स्वागत केलं. यानंतर पक्षाचा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे विधानभवनात पोहल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांनी भेट घेतली.
“कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”
राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाथ अभ्यंकर हे देखील उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे.
Read also
- “सध्या मुख्यमंत्र्यांना ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ”; कोंडगेंचा फोटो ट्विट करून राष्ट्रवादीने डिवचलं
- “बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन
- बचके रहना रे बाबा..! फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा डाव, भुखंड प्रकरण शिंदेंवरच उलटणार
- देवेंद्र फडणवीस पुण्यातून अचानक दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
- “राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी