नागपूर : राज्य सरकारमधील वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्या भागातील दहा शेतकऱ्यांची वाघ किंवा बिबट्याने दुर्दैवी शिकार केली. या मुद्याला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर त्यावर सभागृहात कोणीतीही चर्चा अथवा ठोस उपाययोजना होत नसतील आणि केवळ आझादी का अमृतमहोत्सव बोलत तोंडाची वाफ घालवण्याचा प्रकार सुरु आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली.
“राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी
सत्ताधारी पक्ष केवळ वेळ काढूपणाचे काम करत आहे. त्यांना शेतकऱ्यांविषयी काही देणघेणं नसल्यामुळे अशा सरकारचा धिक्कार आहे असे ते म्हणाले. शिवाय विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर सभागृहात बोलू देत नसतील तर त्यांचे नाक दाबून तोंड उघडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला.
“राहुल शेवाळेंचं मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप, गुंडाच्या माध्यमातून दिली धमकी”
काल दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात मोठा राडा झाला. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू न दिल्याने जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे आज विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस, औरंगाबाद, तासगाव, सांगली, हिंगोली, तिरोडा, देवरी, चंद्रपुर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करीत तीव्र निषेध व्यक्त केला.
राज्य सरकारमधील वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भागातील दहा शेतकऱ्यांची वाघ किंवा बिबट्याने दुर्दैवी शिकार केली. या मुद्याला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार @amolmitkari22 यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. pic.twitter.com/A3hdxSClbt
— NCP (@NCPspeaks) December 23, 2022
Read also
- नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्
- “सध्या मुख्यमंत्र्यांना ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ”; कोंडगेंचा फोटो ट्विट करून राष्ट्रवादीने डिवचलं
- “बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन
- बचके रहना रे बाबा..! फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा डाव, भुखंड प्रकरण शिंदेंवरच उलटणार
- देवेंद्र फडणवीस पुण्यातून अचानक दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण