पुणे : भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागल्याने फडणवीस केंद्रात त्यांचं वजन वाढलं असल्याचं बोलण्यात येत आहे. फडणवीसांच्या निवडीनंतर आखिल भारतीय ब्राम्हण महासंंघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. फडणवीसांच्या दिल्लीतील राजकारणाची सुरूवात पुण्यातून व्हावी, अशी इच्छा ब्राम्हण महासंघाने या पत्रातुन केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
जनाधार गमावल्याने पुण्यात चाचपणी सुरू आहे. सत्ता आल्यावर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, उपमुख्यमंत्री पद हे असंविधानीक आहे अशा प्रकारचे ज्ञान महाराष्ट्राला देणारे , फसवणीसपणा व अकार्यक्षमता यामुळे भाजपाने मुख्यमंत्री पदी नाकारलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे एक मंत्री यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
तसेच नागपूरमध्ये पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी करताय म्हणे ? पुणेकर जनता हुशार आहे ! कुठलंही कर्तृत्व नसताना वडील व चुलतीच्या अर्थातच घरणेशाहिच्या पुण्याईवर स्वतःच्या राक्षशी महत्वकांक्षेसाठी स्वतःच्या पक्षातील बहुजन नेत्यांना राजकारणात संपवून सत्तापदे मिळवणाऱ्याना शिवजन्मभूमी पुणेरी विसर्जन करायला आतुर आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.
“गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
फडणवीस हे भाजपचे भविष्य असून नरेंद्र मोदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्वाची चर्चा होते, त्यात देवेंद्र फडणवास यांंचे नाव अग्रभागी येते. निवडणूक समितीमध्ये निवड ही फडणवीस यांची राष्ट्रीय राजकारणातील सुरूवात मानली जात आहे. भाजपकडून फडणवीस यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला जात असल्याची चर्चा दूरचित्रवाणीवर होत आहे. पुणे हा ब्राम्हण महासंघाचा गड असून फडणवीस यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यामुळे पुण्यातून फडणवीस यांची उमेदवारी जाहीर करावी, असं साकडं महासंघाने भाजप नेत्यांना घातले आहे.
Read also
- “मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
- “शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
- “राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट