पुणे : सध्याचं राज्यातील सरकार हे सर्व सामान्यांचं असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हे डबल इंजीनचं सरकार सध्या वेगाने धावत आहे. सध्याच्या सरकारने सगळ्याचं घटकांना न्याय देण्याचा धडका सुरू केला आहे. त्यामुळे अनेकांना याची धडकी भरली आहे. तसेच महेश लांडगे यांना 2014 साली त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केला होता. अशी आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीच्या कार्यक्रमात करून दिली.
कसबा पेठ पोटनिवडणुक मनसेने लढवावीच,; मनसेच्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे मागणी
ते पुढे म्हणाले की, भोसरी शहराला एक पैलवानांचं शहर म्हणून इतिहास आहे. जेव्हा महेश लांडगे माझ्याकडे आला. तेव्हा ते म्हणाले की, हा दाढीवाला पैलवान नक्कीच जिंकणार. त्यावेळी मी प्रयत्नही केलं. परंतु ज्यांना पारखच नाही. त्याला मी काहीच करू शकत नाही, असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. आमदार महेश लांडगे हे या भागातून अपक्ष म्हणून निवडणून आले. परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती असल्याने आपण एकच आहोत. असं म्हणत शिंदेंनी विरोधी पक्षांचा चिमटा काढला.
सत्यजीत तांबेंचा भाजप कनेक्शन, थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन घेतली जिल्हाध्यक्षांची भेट
2014 साली एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची उमेदवारी मिळावी, य़ासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या मनात देखील मला उमेदवारी देण्याचं होतं. कारण की मी देखील दाढीवाला आहे. दाढीवाला माणूस कुठेही कमी पडत नाही. दाढीवाले भारतात काय करू शकतात, हे सर्वांना माहित आहे. पाकिस्तानमध्ये घुसून गोळ्या घालण्याची ताकद फक्त दाढीवाल्यांमध्ये आहे. असं आमदार मेहश लांडगे यांनी सांगितलं.
Read also
- “हिंदु आक्रोश मोर्चा हा मोदी आणि शहांच्या विरोधात,” संजय राऊतांची भाजपवर प्रखरशब्दात टिका
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत रस्सीखेच आणखीच वाढली, शिवसेना, काॅंग्रेसमध्येच जुंपली
- “बागेश्वर बाबा जिथं दिसेल, तिथे त्याला ठोकून काढा,” संत तुकाराम महाराजांवर केलेल्या विधानानंतर मिटकरी आक्रमक
- ”मुंबई महापालिकेवर आमचाच झेंडा, 2024 ला पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री…” बड्या नेत्याचं भाकित
- ऊर्फी जावेदवर आता टिका नको, तिचं कौतुक करा, चित्रा वाघ यांनी केलं ऊर्फीचं कौतुक