नाशिक : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून शुंभागी पाटील तर त्यांच्याविरोधात डॉ. सत्यजीत तांबे मैदानात उभे राहिले आहेत. यातच सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी तयारी करा. असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिले आहेत. यातच आता सत्यजीत तांबे यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
“सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरा”, भाजपकडून कार्यकर्त्यांना आदेश
सत्यजीत तांबे यांची आज अहमदनगर याठिकाणी प्रचार सभा होती. प्रचार सभेला संबोधित केल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी थेट नगर जिल्ह्यातील भाजपचं कार्यालय गाठलं. त्याठिकाणी त्यांनी नगर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हयाध्यक्ष भैया गंधे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे.
यातच शिक्षक आणि पदवीधर मतदार संंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमचं मत जाणार नाही. जे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. त्यांना आम्ही निवडून देऊ, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर नगर जिल्ह्याचं राजकारण एका रात्रीत बदलंत. त्यामुळे पक्षांनी आदेश दिला तर आम्ही एका रात्रीच सर्व चित्र बदलवू, असं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also
- “पोटनिवडणुकांमध्ये मतं कमी पडली तर तिकीट कापलं म्हणून समजा”, भाजपच्या माजी खासदाराचा नगरसेवकांना इशारा
- “तर त्यांनी हा खटला लवकर दाखल करावा,” इम्तियाज जलील यांचे सुभाष देसाईंवर धक्कादायक आरोप
- “एमआयएमशी युती झाल्यास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार का?” भाजप नेत्याचा सवाल
- अद्वय हिरेंच्या प्रवेशाबाबत भुसेंची प्रतिक्रिया म्हणाले, “ते माझ्याविरोधात उभे राहणार मग..”
- “महात्मा गांधींच्या विचारांची हत्या पंडीत नेहरूंकडून”, सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त व्यक्तव्य