पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीची आता राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. काल कसबा पेठ पोटनिवडणकीसंदर्भात भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तुमच्या प्रभागातील मतं पोटनिवडणुकीत कमी पडलीत तर तुमचं तिकीट कापलंच म्हणून समजा. असा इशारा भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिला आहे.
काल चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात बैठकीत भाजपकडून कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 5 इच्छुक उमेदवारींची यादी केंद्रीय निवडणुक समितीकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. याच बैठकीत संजय काकडे यांनी नगरसेवकांना झापलं आहे. नगरसेवकांनी या निवडणुकीसाठी काम केलेच पाहिजे, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे पाच हजार मतांचं लीड आणणं त्यांच्यासाठी अशक्य नाही. परंतु ज्या प्रभागातून मतं कमी पडलीत. त्या प्रभागातील नगरसेवकांचा पुढच्या निवडणुकीत पत्ता कट होणार हे मात्र नक्की आहे. असं संजय काकडे यांनी बैठकीत बोलतांना सांगितले.
“कितीही गुन्हे दाखल करा, माझ्यावर त्याचा काहीही फरक पडणार नाही”, संतोष बांगर
संजय काकडे यांनी चिंचवड आणि कसबा पेठ या दोन्ही मतदार संघातील नगरसेवकांना इशारा दिला आहे. तसेच चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या घरातच तिकीट देण्याचा विचार सध्या पक्ष करीत आहे. तर कसबा पेठ मतदार संघातील पाच जणांची नावं वरिष्ठांकडे पाठिवली आहेत. लोकांचा विश्वास आमच्यावर अजूनही तसाच आहे. त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल. असा विश्वासही संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.
“बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांना भाजप विसरले”, सामानातून भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, पुण्यातील या पोटनिवडणुकांसाठी सध्या महाविकास आघाडीत मोठी कुजबूज सुरू झाली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत काॅंग्रेस आपला उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे. तर चिंचवडची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही बैठक पार पडली असून या पोटनिवडणुकांमध्ये आपणही निवडणुक लढवावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “तर त्यांनी हा खटला लवकर दाखल करावा,” इम्तियाज जलील यांचे सुभाष देसाईंवर धक्कादायक आरोप
- “एमआयएमशी युती झाल्यास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार का?” भाजप नेत्याचा सवाल
- अद्वय हिरेंच्या प्रवेशाबाबत भुसेंची प्रतिक्रिया म्हणाले, “ते माझ्याविरोधात उभे राहणार मग..”
- “महात्मा गांधींच्या विचारांची हत्या पंडीत नेहरूंकडून”, सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त व्यक्तव्य
- “सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरा”, भाजपकडून कार्यकर्त्यांना आदेश