नाशिक : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना जोराचा झटका दिला आहे. राज्याचे माजी महसुल सहकार महर्षी यांचे पणतू आणि माजी परिवहन मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे , खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झाले. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजप सर्व पक्षांना पत्र पाठवणार”
अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते आता मालेगा बाह्य विधानसभेच्या निवडणुकीत दादा भुसे यांच्या विरोधात उभे राहणार आहे. त्यानंतर दादा भुसे म्हणाले की, पक्षात प्रवेश करणं, आपलं मतं ठेवणं, हा लोकशाहीत ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांना यासाठी शुभेच्छा आहेत. तसेच आगामी निवडणुकीत ते माझ्याविरोधातील उमेदवार असू शकतात. अस दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
“कोश्यारींच्या जागी, सुमित्रा महाजन की अमरिंदरसिंग ?,; येत्या 15 दिवसात राज्याचा राज्यपाल ठरणार”
माझ्या सारखा प्रतिनिधी ज्यावेळी मतदार संघात काम करतो. ते काम फक्त निवडणुकी पुरतं नाही तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिकवण 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहे. असंही दादा भुसे यांनी सांगितले आहे.
“आयुष्य अन् समाज घाण घडवणे हा भाजपचा एकच कार्यक्रम”, रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
दरम्यान, अद्वय हिरे यांनी 2014 साली नांदगाव विधानसभेची जागा लढविली होती. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत ते मालेगाव बाह्यमधून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. हिरे कुटूबीयांचं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठं वलय आहे. त्याचा नक्कीच फायदा शिवसेनेला होणार आहे. असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also
- “महात्मा गांधींच्या विचारांची हत्या पंडीत नेहरूंकडून”, सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त व्यक्तव्य
- “सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरा”, भाजपकडून कार्यकर्त्यांना आदेश
- भोसरीतील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ८ हजार विद्यार्थी- पालकांचा सहभाग , मोदींच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
- “कितीही गुन्हे दाखल करा, माझ्यावर त्याचा काहीही फरक पडणार नाही”, संतोष बांगर
- “बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांना भाजप विसरले”, सामानातून भाजपवर हल्लाबोल