मुंबई : आज संपुर्ण भारत देश आपल्या 74 वा प्रजासत्ताक दिवस साजर करीत आहेत. दिल्लीच्या कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जात आहे. तर अनेक शासकीय, खाजगी कार्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला आहे. यातच आता राष्ट्रवादीने या दिवसाचं औचित्यसाधून सत्ताधारीवर निशाणा साधला आहे.
“फडणवीस साहेब…..! आमच्या पुण्याकडेही लक्ष्य द्या”, सुप्रिया सुळे
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचा स्वीकार करून आपण 26 जानेवारी 1950 रोजी नव्या लोकशाही पर्वाची सुरूवात केली आहे. प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित करतो. मोठ्या उत्साहाने, देशप्रेमाच्या उत्कट भावनेतून आपण हा दिन साजरा करतो.
“सत्यजीत तांबेचा भाजपकडून गेम होणार हे अगोदरच आम्हाला माहिती होतं”
पण आज या संविधानिक मुल्यांची पायमल्ली दिवसेंदिवस होताना आपल्याला दित आहे. भारतीय राज्यघटनेत स्वांतत्र्य, सार्वभौमत्व, संघराज्यीय, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मूलभूत तत्त्वे समाविष्ट केली आहेत. पण आज या तत्वांना हादरे देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करत आहेत. अस राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
“शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला”; गुणरत्ने सदावर्तेंची राष्ट्रवादीवर टीका
आज प्रजासत्ताक दिन साजरा करतांना, आपली राज्यघटना आणि लोकशाहीसमोरील ही आव्हाने आपल्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत. आपल्या देशात समृद्ध लोकशाहीचा वारसा आणि संविधानिक मूल्ये जपण्यासाठी ठाम राहण्याचा निर्धार नागरिकांनी आवश्यक आहे. कारण भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय संविधान हा आपला अभिमान आहे. असंही म्हटलं आहे.
Read also
- “कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस
- शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगरांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिलाय का?” राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
- ‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक
- मुलायम सिंह यादव, झाकीर हुसेन, सुधा मुर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार…! वाचा संपुर्ण यादी