पुणे: एवढ्यातच उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात चांगलेच रणकंदन घडून आले. त्यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. संजय शिंदेंच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामुळे करमाळा परिसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शेतकऱ्यांनी आज कॅम्प परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर भीक मागत, अर्धनग्न होत आंदोलन केले आहे.
हे पण वाचा, संजय शिंदेंची महापालिका राजकारणातील ढवळाढवळ प्रणिती शिंदेंसाठी डोकेदुखी
हे पण वाचा,“मोहिते पाटलांची हुजरेगिरी करणारे संजय शिंदे आता, मला पक्षनिष्ठा शिकवणार”; नारायण आबा पाटील
आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा अतुल खूपसे यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे आता पंजाब नॅशनल बँकेसमोर चांगलाच तणाव निर्माण झाला होता. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर काढलेले कर्ज म्हणजे सरळ सरळ गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. त्यातच शेतकऱ्यांनी या बोगस कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे कोथरूडमधील पंजाब नॅशनल बँकेने वकिलामार्फत शेतकऱ्यांना नोटीस पाठवलेल्या आहेत.
हे पण वाचा,“उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस, आता उजनीच्या पाणी प्रश्नावरून धुळीला मिळेल” आमदार प्रशांत परिचारिक
हे पण वाचा,“अन्यथा जयंत पाटल्यांच्या निवास्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार” अतुल खुपसे
यासंदर्भात न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आज पुण्यातील पंजाब बँकेसमोर थेट आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. बँकेच्या व्यवस्थापकाला यावेळी निवेदन देण्यात आले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर मागितलेली भीक बँकेला देण्यात आलेली आहे. विठ्ठल साखर कारखान्याकडून २०१३ मध्ये खत देतो म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, सातबारा उतारा आणि अनेक ठिकाणी सह्या घेण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांना खत तर मिळाले नाही मात्र कर्जाचे हप्ते न भरल्याची नोटीस आली. २ मे पर्यंत कर्जाची रक्कम भरावी अन्यथा फौजदारी कारवाई करावी लागेल असा इशारा वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आला होता.
हे पण वाचा,
उजनीचा पाणी प्रश्न: इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा; नाहीतर…नारायण पाटलांचा इशारा!
उजनीच्या पाणी प्रश्नी पंढरपुरात टायर जाळून निषेध ; सोलापूर विरुद्ध इंदापूर संघर्ष वाढणार
प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक, उजनीच्या पाण्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे