ठाणे : मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांने दाऊदच्या माणसच्या मदतीन जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपुर्वी व्हायरल झाली. यानंतर धमकी देणारा अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडका असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. त्यावर आव्हाड प्रसिद्धीसाठी हे करत असल्याचा पलटवार शिंदेंनी केला आहे. त्यावर आता पुन्हा एकदा आव्हाडांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “
गेल्या काही दिवसापासून जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि त्यांच्या जावायाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांना जीवे मारण्याचा कट आखत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. तसेच तिहार जेलमध्ये असलेला गॅंगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर यांच्या मदतीने शुटर तैनात केले असल्याचा सनसनाटी आरोप आव्हाडांनी केला. तसेच याचा शिंदेंशी संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावर आव्हाड प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलत असल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे. त्यावर आव्हाडांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल
जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना म्हटलं की, स्वत: ची मुलगी आणि जावयाविषयी खोटा ऑडिओ तयार करणं आणि प्रसिद्धी घेणं, इतका मी क्रुर बाप नाही. प्रसिद्धीसाठी मी नाटक करेनं हे शक्य नाही. ह्याबाबत बोलताना आपण थोडी प्रगल्भता दाखवली असती तर मला खुप बंर वाटलं असतं. आपल्या सहकाऱ्याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका. असं म्हणत आव्हाडांनी शिंदेंना म्हटलं आहे.
स्वत:ची मुलगी आणि जावयाविषयी खोटा ऑडीओ तयार करणं आणि प्रसिद्धी घेणं, इतका मी क्रुर बाप नाही. प्रसिद्धीसाठी मी नाटक करेनं हे शक्य नाही. ह्याबाबत बोलताना आपण थोडी प्रगल्भता दाखवली असती तर मला खूप बरं वाटल असतं. आपल्या सहका-याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका. @mieknathshinde
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 27, 2023
Read also
- हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा
- हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप
- हेही वाचा..राजकारण तापलं…! भाजप हाय हाय, सिसोदिया जिंदाबाद, घोषणा देत आपचं संपुर्ण देशभरात भाजपच्या विरोधात आंदोलन
- हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान
- हेही वाचा..“राजकीय दंगलीत कोणी माझ्यासोबत येईल, अशी शक्यता वाटत नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत