मुंबई : कॉंग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला मुंबईत मोठा फटका बसला आहे. यातच आता बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉंग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
हेही वाचा…“४२ वर्षापासूनचा लढा यशस्वी..!” कोर्टातही मराठा आरक्षण टिकणार, महेश लांडगे यांचा विश्वास
मागील काही दिवसापासून कॉंग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच रात्री उशिरा मुंबई युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. यासंदर्भात रात्री उशिरा पत्रक काढलं. त्यानुसार आता मुंबई युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. देशातील विविध राज्यांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मुंबई प्रदेश युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“आता जाहिराती निघतील, मंजुर झालेलं आरक्षण लागू होणार का ?” देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया
दरम्यान, यातच काही दिवसांपुर्वी बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर झिशान सिद्दीकी देखील अजित पवार गटात प्रवेश करणार. अशा चर्चा रंगल्या होत्या. गेल्या काही दिवसांत त्यांनी कॉंग्रेसच्या बैठकांनाही उपस्थिती लावली नव्हती. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून झिशान यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचाराज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, भाजपचे तीन तर कॉंग्रेस, शिवसेना, अन् राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी
हेही वाचा…“तर मी साडीचा पदर खोचून उभी आहे”, नवनीत राणांनी थेट जलील यांना दिलं आव्हान
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजप पुन्हा मलाच संधी देणार, भाजप खासदार ‘हिना गावित’ हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल