नंदुरबार : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नंदुरबार लोकसभा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु २०१४ च्या निवडणुकीत भाजपने याठिकाणी कॉंग्रेसला सुरूंग लावला. २०१४ साली प्रथमच याठिकाणी भाजपच्या डॉ. हिना गावित याठिकाणी खासदार झाल्या. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने हिना गावित यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा संधी दिली आणि त्यात त्यांना विजय मिळला. यातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील मला भाजप पुन्हा संधी देईल. असा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले पहिल्यांदाच आभार म्हणाले, “ज्या निर्दयीपणाने डोकी फोडली..”
हिना गावित यांच्या उमेदवारीबाबत अनेकांकडून टिका करण्यात येत आहे. त्यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, निवडणुक म्हटली की अनेकजण इच्छूक असतात. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छूक असणारे प्रत्येक उमेदवार हा दुसऱ्या उमेदवारावर टिका करत असतो. भाजपमध्ये जो व्यक्ती प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करतो. सातत्याने लोकांमध्ये काम करत असतो. याचा संपुर्ण अभ्यास करून भाजपमध्ये उमेदवारी दिली जाते. मागच्या दहा वर्षात आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या योजना आणल्या आहेच.
संसदेत सुद्धा माझी कामगिरी वरच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे. पहिल्या दहा खासदारांमध्ये माझं नाव सातत्याने राहिले आहे. तसेच आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मला माझ्या खासदारकीच्या कामगिरीवरून मला मिळालं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की यावेळी देखील मला भाजप लोकांची सेवा करण्यासाठी संधी देईल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”, अन् म्हणे मंत्री, नारायण राणेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
दरम्यान, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते डॉ. विजयकुमार गावित आणि त्यांच्या कन्या खासदार डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षात नाराजी आहे. मित्र पक्षांच्या विकास कामांना नेहमी कात्री लावण्याचा आरोप देखील याठिकाणी झाला आहे.
तर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त खासदार द्यावा अशी मागणी केली होती. मित्र पत्रात उघडउघड नाराजी दिसली असली तरी भाजप पुन्हा एकदा हिना गावित यांना लोकसभेची संधी देणार अस सध्या तरी चित्र दिसत आहे. त्यामुळे हिना गावित पुढच्या लोकसभा निवडणुकीत हॅट्रिक साधणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
EAD ALSO :
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“४२ वर्षापासूनचा लढा यशस्वी..!” कोर्टातही मराठा आरक्षण टिकणार, महेश लांडगे यांचा विश्वास
हेही वाचा…“आता जाहिराती निघतील, मंजुर झालेलं आरक्षण लागू होणार का ?” देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल