अमरावती : जशी जशी लोकसभा निवडणुक जवळ येत आहे. तसा तसा राजकीय नेत्यांचा पारा वर जातांना दिसत आहे. यातच छत्रपती संभाजीनगर येथील खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती. त्यावर आता एका कार्यक्रमात नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
हेही वाचा…“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
नवनीत राणा यांना अमरावतीत येऊन लोकसभा निवडणुकीत पाडून दाखवू, असे विधान इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपुर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा नवनीत राणा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले, पण मी कुणालाही घाबरत नाही, असे म्हणत तुमच्यातच हिमंत असेल तर माझ्याविरोधात अमरावतीतून निवडणूक लढवावी आणि माझा पराभव करून दाखवावा, असे आवाहनच राणा यांनी जलील यांना दिलं आहे.
हेही वाचा…ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले पहिल्यांदाच आभार म्हणाले, “ज्या निर्दयीपणाने डोकी फोडली..”
दरम्यान, ओवेसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलल्यास ते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल, असा इशारा देखील जलील यांनी दिला होता. त्यावर हिमंत असेल तर अमरावतीत येऊन दाखवा मी साडीचा पदर खोचून उभी आहे. असं म्हणत नवनीत राणा यांनी जलील यांचा खरपुस समाचार घेतला. तसे या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावचं लागेल. असा पुनर्रच्चा देखील त्यांनी यावेळी केला.
EAD ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजप पुन्हा मलाच संधी देणार, भाजप खासदार ‘हिना गावित’ हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“४२ वर्षापासूनचा लढा यशस्वी..!” कोर्टातही मराठा आरक्षण टिकणार, महेश लांडगे यांचा विश्वास
हेही वाचा…“आता जाहिराती निघतील, मंजुर झालेलं आरक्षण लागू होणार का ?” देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया