अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज (५ ऑक्टोबर) निकाल लागला. यात परिवर्तन व सहकार पॅनल आमनेसामने होते. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनलकडून निवडणूक रिंगणात होते. आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव केला. बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला. बच्चू कडू विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी चांगलाच जल्लोष केला.
रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद – फडणवीस
या विजयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांनी चीड व्यक्त केलीय आणि त्याचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिलं की जो शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो.” “ज्यांच्याविरोधात आम्ही निवडून आलो त्यांना इतकंच सांगेल की सुटाबुटात राहून निवडणूक लढता येणार नाही. सामान्य माणसापर्यंत जावं लागेल. सावकारकी सोडावी लागेल. त्याशिवाय विजय होणार नाही. आता ही बँक आम्ही शेतकऱ्याच्या दारापर्यंत नेण्याचा प्रयत्न करु,” असंही बच्चू कडू यांनी नमूद केलं.
आतापर्यंत हाती आलेले निकाल
सहकार पानेल 8 विजयी उमेदवार—
- वीरेंद्र जगताप चांदूर रेल्व
- श्रीकांत गावंडे धामणगाव
- सुरेश साबळे तिवसा
- सुधाकर भारसाकडे दर्यापूर
- हरिभाऊ मोहोड भातकुली
- सुनील वऱ्हाडे अमरावती
- दयाराम काळे चिखलदरा
- प्रकाश काळबांडे सहकारी पत संस्था…
परिवर्तन पॅनल चे विजयी उमेदवार
- राज्यमंत्री बच्चू कडू चांदूरबाजार
- चित्रा डहाने मोर्शी
- अजय मेहकरे अंजनगाव सूर्जी
- जयप्रकाश पटेल धारणी
अपक्ष विजयी उमेदवार
- अभिजित ढेपे नांदगाव खंडेश्वर
- नरेशचंद्र ठाकरे वरुड
- आनंद काळे अचलपूर
VIDEO: "शेतकऱ्याच्या विरोधात जाणार, त्याचा पराभव होणार", अमरावती जिल्हा बँक विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया@RealBacchuKadu @KaduOffice #Bachchukadu #Amravati pic.twitter.com/5f7l6cgw9e
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू 🇮🇳✊ (@PravinSindhu) October 5, 2021
Read Also :
- देशात अघोषित आणीबाणी, हे रामराज्य आहे का? – संजय राऊतांचा रोखठोक सवाल
- जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकणार?
- देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने, राज्यातील परिवर्तनाची गती वाढेल – चंद्रकांत पाटील
- कोरोनाची तिसरी लाट येईल असं वाटत नाही, तशी चिन्ही दिसत नाहीत – मुंबई महापालिका
- रामदास कदमांवर शिवसेना कारवाई करणार? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष