पुणे : पुण्यात बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरला पुण्यात भाजपचे माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बागेश्वर बाबांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याला अजित पवार गटाचे नेते सुदर्शन जगदाळे यांनी विरोध दर्शविला आहे. त्यावर आता पुण्यात अजित पवार गट विरूद्ध भाजप असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…ठरलं तर मग..! माधुरी दिक्षीत लोकसभा निवडणुक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश करणार ?
बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांचा २० नोव्हेंबरपासून तीन दिवसांचा दिव्य दरबार पुण्याचे माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आयोजित केला आहे. संगमवाडी येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हनुमान कथा आणि दिव्य दरबार यांचा समावेश असणार आहे. त्यावर जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही. अशी फेसबुक पोस्ट करत अजित पवार गटाचे सुदर्शन जगदाळे यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवार गट असा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटात राडा, ठाकरे अन् शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
दरम्यान, जगदिश मुळीक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याआधी भाजपचेच खासदार भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वरबाबांचा दरबार भरवला होता. परंतु पुण्यात आता त्याला विरोध करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाचे ‘९’ शिलेदार निवडणुकीसाठी तयार, लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर ?
हेही वाचा…पवारांनी उध्दवजींना सावध केलं की, मातोश्रीवर बॉम्बहल्ला करण्याचा कट..,’नारायण राणें’नी सांगितला थरारक किस्सा
हेही वाचा…भाजप, काॅंग्रेसमध्ये होणार काट्याची टक्कर, विधानसभेच्या ३०० जागांसाठी ‘या’ दोन राज्यांत आज मतदान
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! लोकसभा निवडणुक ‘या’ मुद्यावर लढवणार, जानेवारीच्या ‘या’ घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष ?
हेही वाचा…जालन्यात आज ओबीसींचा एल्गार, सभेसाठी कोण कोणते नेते येणार ? यादी आली