भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी पथकाचा छापा पडला आहे. जीएसटी थकवल्यामुळे ही रेड पडल्याची बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे.
सकाळी दहा वाजल्यापासून जीएसटीचे अधिकारी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची चौकशी करत आहेत. नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र आज सकाळपासून ही चौकशी सुरू आहे.
हेही वाचा… का हवीय राष्ट्रवादीला पुणे लोकसभेची जागा? काँग्रेसशी दोन हात करण्याची तयारी..
पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांतून चर्चेत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगडावरील नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे उपस्थित आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू हे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेलं होतं.
हेही वाचा… मोठी बातमी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार
विशेष म्हणजे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रीदेखील याच मंचावर उपस्थित होते. भगवानबाबा भक्त आणि येथील समाजासाठी धनंजय मुंडे- पंकजा मुंडे बंधू भगिनी एकत्रित आल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं. राजकीय दुरावा असला तरीही समाजासाठी आम्ही एकत्र येऊ, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं होतं. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मात्र इकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.
Read also
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयातून दिलासा..!
हेही वाचा… ‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले?’; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकारणात खळबळ
हेही वाचा… चंद्रकांतदादांचे काम म्हणजे “गिरे तो भी टांग उपर”, दादा आता तरी जरा दमान घ्या!