सोलापूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर आरक्षणासाठीही मागणी जोर धरू लागली आहे. ठिकठिकाणी आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
हेही वाचा…“मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा..,” राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत मनसेने फडणवीसांना डिवचलं
राधाकृष्ण विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर असून ते एका रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. त्याचवेळी धनगर आरक्षणाचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेखर बंगाळे यांनी विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला. विखे पाटील निवेदन वाचत असतानाच अचानक बंगाळे यांनी खिशात हात घालून भंडाऱ्याची पुडी त्यांच्या अंगावर उधळली. त्यामुळे त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा…शरद पवारांच्या सभांचा धडका, अजित पवार गटातही जोरदार हालचाली सुरू
दरम्यान, भंडारा उधळणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचठिकाणी त्याला लाथा बुक्क्यांनी पोलिसांनी तुडवलं. याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं. पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच. भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील! असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय.
पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच…
भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको.
धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील!— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) September 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून खाली उतरवलं, अन् हातपाय तोडण्याची दिली धमकी
हेही वाचा…“खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्येही सुरू,” वडेट्टीवारांचा ट्रीपल इंजिन सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“धनगर आरक्षण तापलं, आंदोलनकांनी मंत्र्यांवर भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण”
हेही वाचा…सरकारचा जीआर घेऊन शिष्टमंडळ पोहचले, पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम
हेही वाचा…“कुणीही घोषणा करून मराठा आरक्षण मिळणार नाही”, पंकजा मुंडेंचा शिंदेंना जोरदार टोला