मुंबई : भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राजू माणिकराव कारेमारे यांना अर्ध्या रस्त्यातूनच ओला टॅक्सी चालकाने गाडीतून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर आमदाराला हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली, अखेर आमदाराने पोलिसात तक्रार देतात खाजगी चालकाविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या सभांचा धडका, अजित पवार गटातही जोरदार हालचाली सुरू
राष्ट्रवादीचे आमदार राजू माणिकराव कारेमारे हे बुधवारी सकाळी दिल्लीवरून मुंबई विमानतळावर आले. तेथून आकाशवाणी आमदार निवासाकडे जाण्यासाठी त्यांनी ओला टॅक्सी केली. आमदारांना टोल माफ असल्यामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील संबंधित मार्गिकेवरून टॅक्सी घेऊन चल, असे चालकाला सांगितले. मात्र टॅक्सी चालकाने जाण्यास नकार दिला.
हेही वाचा…शरद पवार गटाची मुंबईत तातडीची बैठक, सर्वच आजी, माजी आमदार, खासदारांना बोलवलं, चर्चांना उधाण
दरम्यान, चालकाने नकार देत टोलच्या पैशांवरून आमदाराशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्याने कारेमारे यांना वाकोला जंक्शन येथे टॅक्सीतून खाली उतरवले तसेच हात पाय तोडून ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर कारेमारे यांनी पोलिसात तक्रा दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्येही सुरू,” वडेट्टीवारांचा ट्रीपल इंजिन सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“धनगर आरक्षण तापलं, आंदोलनकांनी मंत्र्यांवर भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण”
हेही वाचा…सरकारचा जीआर घेऊन शिष्टमंडळ पोहचले, पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम
हेही वाचा…“कुणीही घोषणा करून मराठा आरक्षण मिळणार नाही”, पंकजा मुंडेंचा शिंदेंना जोरदार टोला
हेही वाचा…“मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा..,” राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत मनसेने फडणवीसांना डिवचलं