अकोला : 50 खोके एकदम ओके ह्या पॅटर्नची जगातील ३३ देशांनी दखल घेतली आहे. हाच खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्ये ट्रीपल इंजिन सरकारने सुरू केला आहे. नोकरीच्या नावाखाली सरकार तरूणांकडून कोट्यवधी रूपयांचे परिक्षा शुल्क गोळा करून खाजगी कंपन्यांना फायदा पोहचवत असल्याची टिका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. काल अकोला शहरातील युवा काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या जनसंवाद बाईक रैलीमध्ये सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते..
हेही वाचा…शरद पवार गटाची मुंबईत तातडीची बैठक, सर्वच आजी, माजी आमदार, खासदारांना बोलवलं, चर्चांना उधाण
तलाठी भरती व इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार हा दरदिवशी बातम्यांमधून जनता बघतच आहे. हे भ्रष्टाचारी सरकार आता आम्हाला नको अशी भावना आकोला शहारातील युवकांनी यात्रेदरम्यान व्यक्त केली आहे. यापुढे आमची साथ ही राहुल गांधी व काॅंग्रेस पक्षाला असेल हा निर्धार त्यांनी व्यक्त केला असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.
हेही वाचा…“जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करतंय का ?”
दरम्यान, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील युवा मतदारांसोबत संवाद साधण्याचा संकल्प शहरातील युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या संकल्पात साथ देण्यासाठी आज अकोला जिल्हा दौऱ्यावर होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देणार होते, आता ते स्वतः कबुल करतात की ९ वर्षात फक्त ९ लाख लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहे . ज्यांना जनतेच भलं करण्याची जबाबदारी दिली होती, ते ईडी आणि खोक्यांच्या बळावर पक्ष फोडण्यात व्यस्त आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
अकोला शहरातील युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या जनसंवाद बाईक रैली मध्ये सहभागी झालो.
“50 खोके एकदम ओके” ह्या पॅटर्नची जगातील ३३ देशांनी दखल घेतली. हाच खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरती मध्ये ट्रीपल इंजिन सरकारने सुरू केला आहे. नोकरीच्या नावाखाली सरकार तरुणांकडून… pic.twitter.com/iZsLIK0RGQ
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“धनगर आरक्षण तापलं, आंदोलनकांनी मंत्र्यांवर भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण”
हेही वाचा…सरकारचा जीआर घेऊन शिष्टमंडळ पोहचले, पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम
हेही वाचा…“कुणीही घोषणा करून मराठा आरक्षण मिळणार नाही”, पंकजा मुंडेंचा शिंदेंना जोरदार टोला
हेही वाचा…“मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा..,” राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत मनसेने फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…शरद पवारांच्या सभांचा धडका, अजित पवार गटातही जोरदार हालचाली सुरू