सोलापूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर आरक्षणासाठीही मागणी जोर धरू लागली आहे. ठिकठिकाणी आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
हेही वाचा…“जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करतंय का ?”
राधाकृष्ण विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर असून ते एका रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. त्याचवेळी धनगर आरक्षणाचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेखर बंगाळे यांनी विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला. विखे पाटील निवेदन वाचत असतानाच अचानक बंगाळे यांनी खिशात हात घालून भंडाऱ्याची पुडी त्यांच्या अंगावर उधळली. त्यामुळे त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा…“नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर..,” रोहित पवारांचा नरेंद्र मोदींवर घणाघात
दरम्यान, भंडारा उधळणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचठिकाणी त्याला लाथा बुक्क्यांनी पोलिसांनी तुडवलं. याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं. तर त्याव्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल करू नका, भंडारा हे पवित्र आहे. तो उधळण्याने मी पवित्र झालो अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…सरकारचा जीआर घेऊन शिष्टमंडळ पोहचले, पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम
हेही वाचा…“कुणीही घोषणा करून मराठा आरक्षण मिळणार नाही”, पंकजा मुंडेंचा शिंदेंना जोरदार टोला
हेही वाचा…“मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा..,” राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत मनसेने फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…शरद पवारांच्या सभांचा धडका, अजित पवार गटातही जोरदार हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवार गटाची मुंबईत तातडीची बैठक, सर्वच आजी, माजी आमदार, खासदारांना बोलवलं, चर्चांना उधाण