रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील काही दिवसांमधील औरंगाबाद याठिकाणी तिसरी सभा होत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेनेने राज ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. अशातच आता शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आगामी 5 जून रोजी राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा आहे. त्यावरून ते म्हणाले की, राज ठाकरे यापुर्वी योगींना गंजा म्हणजे टकला म्हणाले होते. आता अयोध्येत जाऊन योगींच्या टकलीवर राज ठाकरे शाई लावणार आहेत का? हनुमान मागवर्गीय आहे, आणि तो जंगलात राहणारा प्राणी आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. आता राज ठाकरे कोणत्या तोंडाने त्यांचं कौतुक करत आहेत. तिथे जाऊन योगींच्या डोक्यावर केस आलेत की नाही? हे बघणार आहेत का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
“आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा”; धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान
गुजरात दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. नरेंद्र मोदींच्या आंघोळीचं पाणी महाराष्ट्रातील नेत्यांनी प्यायला पाहिजे, इथेपर्यंत त्यांची भाषा गेली. यानंतर काही काळांनी लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत निवडणुकीच्या काळात त्यांनी मोदींवरच टिका केली. त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला. झेंड्याचा रंग बदलला. मला कोणी हिंदु किंवा हिंदुह्दय सम्राट म्हणायचं नाही. मला फक्त मराठी सम्राट म्हणायचं असं आदेशही त्यांनी काढले. त्यामुळे मला वाटतं ते परिवर्तनवादी भोंगा आहेत. असं मी म्हणतो.
“ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”
दरम्यान, औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या सभेसाठी सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भात पाोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी माहिती दिली आहे. शहरात कुठेही वाद, भांडण दिसले तर नागरिकांनी हेल्पलाईन 112 वर संपर्क करावा. तसेच शहरात 750 सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणांहुन राज ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
Read also:
- “मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
- “ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
- भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा पुन्हा अपघात; पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर थोडक्यात बचावले
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या