मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीनंतर प्रमाण जास्तच वाढला आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भुषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे,.
हेही वाचा…“जुन्या पेन्शनसंदर्भात सरकार तातडीने निर्णय घेणार नाही, २० लाख संपकरी संपाच्या वाटेवर”?
हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी बघितलं स्वप्न होतं. ते विचार सध्या शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जात आहेत. आम्ही पहिल्यापासून एकत्रित काम केलं असून त्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांच्या कामाचा वेग, क्षमता आणि सामान्य लोकांसाठी जे काम करीत आहे. ते जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. असं भुषण देसाई यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस एकत्र, निलंबणाची मागणी, कर्ज थकवलं, काय काय आरोप केलेत?
दरम्यान, आगामी दिवसात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमका निर्णय कुणाच्या बाजूने लागतो. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याआधी पण अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या दिशेने जात आहेत.
Read also
- हेही वाचा…जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला, २० लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, बैठक निष्फळ
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीयाला अटक, शीतल म्हात्रे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी, प्रकरण चिघळलं
- हेही वाचा…“दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओवरून अजित पवार संतापले
- हेही वाचा..बच्चू कडूंना अटक करा, आसामच्या विधानसभेत मागणी, विरोधक आक्रमक, ‘ते’ वक्तव्य भोवलं
- हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?