मुंबई : राज्यात आगामी काही काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी राज्यातील एव्हाना देशातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असून येत्या 10 जुन रोजी राष्ट्रवादीची जाहीर सभा अहमदनगर जिल्ह्यात होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा…भाजपच्या ४ आमदारांकडून मंत्रीपदासाठी पावणे दोन कोटींची मागणी, जे.पी.नड्डा यांचे स्वीय सहायक म्हणून…
येत्या १० जुन रोजी राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नगरमध्ये नियोजित करण्यात आला आहे. त्यावेळी राष्ट्रवादीची मोठी सभा होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये भाकरी फिरणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ज्यांनी ३ वर्ष पक्षाचं काम केलं आहे. त्या जिल्ह्याध्यक्ष, तालुकाध्यक्षांना बदलण्यात येणार असून त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारीही देण्यात येणार आहे.
हेही वाचा…“राज्यात ‘सत्ता-संघर्ष’ झाला नाही, तर तो एकनाथ शिंदेंच्या मदतीने घडवून आणलेला तो ‘सट्टा’’”
याचसोबत राष्ट्रवादीकडून बुथ पातळीवर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी यंत्रणा देखील सज्ज करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून शिबिरं देखील घेण्यात येणार असल्याची माहिती जंयत पाटलांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…“कोर्टाने शिंदे गटाला बेकायदेशीर ठरवलंय, हे लोकांना पटवून सांगा”, उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…बैठकांवर बैठका झाल्या, अन् पेच मिटला, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्या शपथविधी
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?
हेही वाचा…“न शिकलेल्या माणसाला समजू शकतं, मग ‘नार्वेकर’ तर सुप्रिद्ध घराण्यातले वकील”, आव्हाडांचा हल्लाबोल