नागपुर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला धोका नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होण्याची शक्यता आहे. यातच मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक मंत्री वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रिपदासाठी चार आमदारांकडून पैसे मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी राज्यात आघाडी निर्माण केल्याने राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर”, जयंत पाटील
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावे भाजपच्या चार आमदारांकडून एका भामट्याने पैसे मागितला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजप आमदार विकास कुंभारे यांनी तक्रार दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलीसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता. त्यांनी निरज सिंह राठोड याला मोरबी, अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…“राणेंनी राज ठाकरेंची इज्जतच काढली…! १ आमदार असलेल्या पक्षांनी ३०२ खासदार असलेल्या पक्षांबद्दल बोलू नये”
भाजपचे आमदार विकास कुंभारे आणि आमदार टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपुर्वी फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तींनी स्वत:ची ओळख जे. पी. नड्डा यांचे स्वीय सहायक असल्याचं सांगितलं. त्यांनंतर मंत्रीपदासाठई पक्षनिधी म्हणून त्यांनी त्यांच्याकडून पावणेदोन कोटी रूपये देण्याची मागणी केली. अशीच मागणी आमदार तानाजी मुरकूटे आणि नारायण कुचे या दोन आमदारांकडून करण्यात आली. त्यानंतर कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले असता. हा सर्व प्रकार समोर आला.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात ‘सत्ता-संघर्ष’ झाला नाही, तर तो एकनाथ शिंदेंच्या मदतीने घडवून आणलेला तो ‘सट्टा’'”
हेही वाचा…आघाडीच्या ‘त्या’ समितीत सेनेकडून संजय राऊतांचं नाव निश्चित, तर दुसरा नेता कोण ?
हेही वाचा…कर्नाटकतला पेच मिटला..! ‘सिद्धरामय्या’ मुख्यमंत्री तर ‘डी. के. शिवकुमार’ हे उपमुख्यमंत्री ?
हेही वाचा…मोठी बातमी..! देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, सक्तीच्या विश्रांतीवर
हेही वाचा…संसदेतील जबाबदार लोकप्रतिनिधींची पिंपरी-चिंचवडला बेजबाबदार वागणूक?