पिंपरी । विशेष प्रतिनिधी : बारामतीच्या खासदार डॉ. सुप्रिया सुळे आणि शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून अधिकृत निमंत्रण असतानाही विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांना महापालिकेच्या कार्यक्रमांचे वावडे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…शिवसेनेच्या घटनेवरून निकाल देणार? शिवसेना कुणाची? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
संसदेतील उत्तम कामगिरी करणारे संसदपटू म्हणून ओळख असलेल्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पिंपरीतील एच.ए. मैदानावर सुरू असलेल्या ‘शिवपूत्र संभाजी’ महानाट्यच्या सेटवर भेट दिली. राष्ट्रवादीचेच शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुळे आणि कोल्हे यांची भेट झाली.
दरम्यान, त्याच दिवशी (दि.१५ मे) पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील विविध २३ प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून अधिकृतपणे ‘प्रोटोकॉल’नुसार निमंत्रित करण्यात आले.
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोलाचे योगदान असल्याचा दावा वारंवार करण्यात येतो. याहून पुढे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी कार्यक्रमानंतर ‘‘राष्ट्रवादीच्या काळातील कामाचे श्रेय भाजपा घेत आहे…’’ असा दावाही केला होता. मात्र, कार्यक्रमाचे निमंत्रण असतानाही शहराचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखवली. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहरात असतानाही त्यांनी महापालिकेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खरोखर पिंपरी-चिंचवडप्रति आत्मियता आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
निवडणुकीचे ‘स्टार कॅम्पेनर’ पण….
खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘स्टार कॅम्पेनर’ आहेत. आगामी महापालिका, विधानसा आणि लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या सभा शहरात होती. त्यांच्या भाषणांच्या तोफा झडतील. पण, पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी या नेत्यांना वेळ उपलब्ध होत नाही, ही बाब पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हारी लागणारी आहे, अशी चर्चा सामान्य नागरिकांमधून सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी राज्यात आघाडी निर्माण केल्याने राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर”, जयंत पाटील
हेही वाचा…“राणेंनी राज ठाकरेंची इज्जतच काढली…! १ आमदार असलेल्या पक्षांनी ३०२ खासदार असलेल्या पक्षांबद्दल बोलू नये”
हेही वाचा…सावनेर मतदार संघात काॅंग्रेसचे दोन नेते आमनेसामने, देशमुख केदारांच्या विरोधात दंड थोपडणार?
हेही वाचा…राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत भाजपचा विजय, ईश्वरी चिठ्ठीतून भाजपची बाजी
हेही वाचा…बुलढाणा बाजार समितीवर ठाकरे गटाचं गुलाल, आमदार संजय गायकवाडांना मोठा धक्का