जामखेड : कर्जत-जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडणुकीसाठी आता हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी आण भाजपला या निवडणुकीत ९-९ जागा मिळाल्याने इश्विरी चिठ्ठी काढण्यात आली. या इश्विरी चिठ्ठीत भाजपने बाजी मारत राष्ट्रवादीकडून सभापती पद हिसकावून घेतलं. त्यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
हेही वाचा…“सरकारमध्येच एकच शहाणा माणूस, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी सगळेअतीशहाणे किंवा मूर्ख”
बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया झाल्यानंतर सर्व १८ संचालकांना १ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आर.एफ.निकम, तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एन.बी. मुंडे काम पाहिले. यावेळी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना समान जागा मिळाल्याने इश्विरी चिठ्ठीचा वापर करण्यात आला. त्यामुळे सभापती म्हणून भाजपचे शरद कारले तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादीचे कैलास बराट यांची निवड करण्यात आली.
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी आणि भाजपला समान जागा मिळाल्यानंतर सभापती निवडीसाठी मोठा पेच निर्माण झाला. त्यामुळे सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता लागून राहिली होती.. तर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सभापती भाजपचाच होईल असं सुतोवाच केलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष होतं.
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार
दरम्यान, सभापती निवडणुक प्रक्रियाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. कर्जत जामखेडमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी पोलीस निरिक्षक महेश पाटील लक्ष ठेऊन राहिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…बुलढाणा बाजार समितीवर ठाकरे गटाचं गुलाल, आमदार संजय गायकवाडांना मोठा धक्का
हेही वाचा…शिवसेनेच्या घटनेवरून निकाल देणार? शिवसेना कुणाची? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल
हेही वाचा…भाजप इलेक्शन मोडवर..! आगामी निवडणुकांबाबत पुण्यात भाजपची रणनीती ठरणार?
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले