पुणे : पुण्यासह अनेक ठिकाणी देशप्रेमाविषयी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्ज्ञज्ञ प्रदीप कुरूलकर यांना पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपीनीय माहित पुरविल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्यांना सध्या तुरूंगात ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबाबत अनेक गोष्टी उघड होत आहेत. याच प्रकरणात आता हवाई दलातील एका अधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…‘कर्नाटक पॅटर्न’ काॅंग्रेस महाराष्ट्रातही राबवणार ? निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरूवात
जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरावरून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, पंधरा दिवसापुर्वी कुरूलकर पाकिस्तानला आपल्या देशाची संरक्षण संशोधनांची गुपित देत होता. या कारणासाठी तो पकडला गेला आहे. आता या प्रकरणात शेंडे देखील असाच पकडला गेला आहे. आपले इमान इतके स्वरस्त आहे. असं म्हणत दोघेही महाराष्ट्रातले हे दुर्दैव आहे.
हेही वाचा…भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद रूचेना..? मुळीक म्हणाले “आजही आमच्या मनात सल…”
पुढे बोलतांना आव्हाड म्हणाले की, आज जर महाराष्ट्रात महाराज असते तर हत्तीच्या पायी दिले असते. हाच कुणी कुरेशी किंवा सय्यद असता तर.त्याचं काय झालं असतं. ते सर्वांना माहिती आहे. गद्दारांना जाती धर्माशी काही घेणंदेणं नसते. असं म्हणत त्यांनी देशातील अंधभक्तांना टोला लगावला आहे.
पंधरा दिवसापूर्वी कुरुलकर ला पाकिस्तान ला आपल्या देशाची संरक्षण संशोधनांची गुपित देत होता ह्या साठी पकडला आता शेंडे सापडला हेच करतांना..
आपले इमान इतके स्वस्त आहे
दुर्दैवाने दोधे ही महाराष्ट्रातले
महाराज असते तर हत्ती च्या पायी दिले असतेहाच कुणी कुरेशी किंवा सय्यद असता तर ..…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारमध्येच एकच शहाणा माणूस, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी सगळेअतीशहाणे किंवा मूर्ख”
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार
हेही वाचा…जामखेड बाजार समितीचा सभापती कुणाचा ? रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
हेही वाचा…निवडणुकांचा बिगुल वाजला..! महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये, फडणवीसांचे संकेत