नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजवप दणदणीत विजय मिळवला. याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. यातच आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून मोठ्या राजकीय हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा अहवाल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटकमधील मानहानीकारण पराभवाचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या आठवड्यात जे.पी. नड्डा हा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर करणार आहेत. पक्षाने हा पराभव सामुहिक अपयशाच्या श्रेणीबाहेर ठेवला आहे. म्हणजेच यासाठी प्रत्येकाला दोष देऊन चालणार नाही. पण पराभवाची सर्व कारणे आणि त्यानंतर उपाय म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.
हेही वाचा…डीआरडीओ कुरूलकर प्रकरणात नवी माहिती, वायुदलाचा अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये
निवडणुक व्यवस्थापनातील अशा अनेक त्रुटी वारंवार समोर आल्य आहेत. ज्याबद्दल पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने सतर्क केले होते. ज्यात येडियुरप्पा यांची सीएम पदावरून हकालपट्टी करण्यापासून ते सीएम बसवराज बोम्मई यांना मोकळे हात न देणे, तिकीट वाटपात समस्या आणि नेत्यांमधील भांडण, समस्या सोडवण्यासाठी जबाबदारी असलेल्या टीमला चुकांची किंवा भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती नसणे व त्यांनी हे वरिष्ठ नेत्यांना देखील न कळवणे. असं अहवालात सांगण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जामखेड बाजार समितीचा सभापती कुणाचा ? रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
हेही वाचा…निवडणुकांचा बिगुल वाजला..! महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये, फडणवीसांचे संकेत
हेही वाचा…‘कर्नाटक पॅटर्न’ काॅंग्रेस महाराष्ट्रातही राबवणार ? निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद रूचेना..? मुळीक म्हणाले “आजही आमच्या मनात सल…”
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर